Chetan Bodke
उन्हाळ्याच्या दिवसांत अनेकांना ऊसाचा रस प्यायला आवडतं. ऊसाचा सर आरोग्यासाठी फायदशीर मानला जातो.
ऊसाच्या रसात मैग्नीशिअम, मॅगनीज, जिंक, आयरन, कॅल्शियम, पोटेशियम सारखे पोषक तत्वे असतात.
ऊसाचा रस पिणे आरोग्यासाठी नुकसानकारक आहे की फायदेशीर याबद्दल डॉक्टर विजय यांनी सांगितले आहे.
ऊसाच्या रसात २७० कॅलरी आणि १०० ग्राम साखरेचं प्रमाण असतं. ऊसाच्या रसाचं अधिक सेवन केल्याने वजन वाढण्याची शक्यता आहे.
ऊसाच्या रसात पॉलिकॉसनॉल नावाचं पोषक तत्व असतं. हा घटक शरीरातील रक्त पातळ करतं.
दुखापत ग्रस्त व्यक्तीने ऊसाच्या रसाचे सेवन करू नये, कारण पॉलिकॉसनॉलमुळे रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.
काविळ झाल्यास ऊसाच्या रसाचं सेवन करणं चांगलं मानलं जातं. लिव्हर सदृढ करण्यासाठी ऊसाचा रस फायदेशीर आहे.
काविळ झाल्यानंतर शरीरातील प्रोटीन कमी होते. त्यावेळी ऊसाच्या रस प्यायल्याने रक्तातील बिलीरुबिन वाढते व शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढतो.
ऊसाच्या रसामध्ये विविध प्रकारचे अँटीऑक्सिडेंट असतात. यामुळे बिलीरुबिनला नियंत्रणात आणण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांसोबत संपर्क साधा.