ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात गाजर खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो. यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात.
दररोज एक गाजर खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.
गाजरमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, बायोटीन, पोटॅशियम कॅल्शियम आणि बीटा- कॅरेटीन असते
गाजरामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.आणि कॅलरीज कमी असते.
गाजराचा सॅलेडमध्ये समावेश केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
गाजरामध्ये असलेले बीटा- कॅरेटीन आणि व्हिटॅमिन ए डोळ्यांना निरोगी ठेवण्यास मदत करतात.
गाजराचे सेवन केल्यास पचनाची समस्या दूर होते.आणि पचनसंस्था निरोगी राहते.
गाजरामध्ये ल्युटीन, लाइकोपाइन सारखे पोषक घटक त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
NEXT: काजू खाल तर फिट व्हाल, 'हे' जबरदस्त फायदे