ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केळ्याचे सेवन करणे शरीरीकरिता अत्यंत फायदेशीर मानले जाते.
केळीमध्ये असे अनेक पोषक तत्वे आहेत, जे शरीरीकरिता महत्त्वाचे आहेत.
पण तुम्हाला माहिती आहे का हिवाळ्यात केळं खाल्याने काय होते ?
तज्ञांचे म्हणणे आहे की, हिवाळ्यात केळं खाल्याने शरीराला ताकद आणि इंस्टेंट एनर्जी मिळते.
व्हिटॅमिन C आणि B6 जास्त प्रमाणात असल्यामुळे केळं रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.
केळीमध्ये असलेले फायबर आणि प्रोबायोटिक्स पचनास मदत करतात आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून आराम देतात.
केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते, जे ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.