Manasvi Choudhary
सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी गरम किंवा कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
गरम पाणी शरीराचे तापमान किंचित वाढवते, ज्यामुळे मेटाबॉलिजम सुधारतो हे शरीरातील साठलेली चरबी जाळण्यास मदत करते. जर तुम्ही यात थोडे लिंबू आणि मध टाकले, तर त्याचे रिझल्ट अधिक वेगाने मिळतात.
जेव्हा तुम्ही गरम पाणी पिता, तेव्हा शरीरातून घाम येतो आणि लघवीवाटे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात. यामुळे रक्त शुद्ध होते आणि त्वचा आतून स्वच्छ होते.
अनेकांना सकाळी पोट साफ न होण्याची समस्या असते. कोमट पाणी प्यायल्याने आतड्यांच्या हालचाली सुलभ होतात. यामुळे बद्धकोष्टतेचा त्रास होत नाही.
शरीरातील विषारी घटक बाहेर पडल्यामुळे त्वचेवरील मुरुम आणि डाग कमी होतात, ज्यामुळे चेहरा ग्लो करतो.
पाणी नेहमी आरामात बसून आणि घोट-घोट करून प्यावे, उभे राहून पाणी पिणे टाळावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.