Manasvi Choudhary
नारळाचे पाणी पोषक तत्वांनी भरपूर असते. त्यास आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते.
नारळाचे पाण्याला उन्हाळ्यात पिण्यासाठी पसंती दिली जाते. पण नारळ पाणी प्रत्येक सिझनमध्ये पिण्यास उत्तम असते.
नारळ पाणी प्यायल्याने अनेक फायदे होत असतात. त्वचा चांगली राहते. मूतखड्याचा त्रास कमी होतो. पचन क्रिया सुधारते.
ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी नारळ पाणी वरदान आहे. नारळ पाणी सोडियमचा प्रभाव कमी करते.
नारळ पाण्यात फायबर असल्याने अन्न पचन होण्यास खूपच फायदेशीर आहे.
जर मूतखड्याचा त्रास असेल तर नारळ पाणी प्यायले पाहिजे. यामुळे मूत्र विसर्जन वारंवार होत असते. त्यामुळे किडनी स्टोन तयार होणाऱ्या खनिजांचे प्रमाण कमी होते.