Saam Tv
चक्कर आलेल्या व्यक्तीच्या तोंडावर पाणी मारणे ठरू शकते जीवघेणे 'ही' चूक थांबवू शकते श्वास.
रक्तातील साखर अचानक कमी होणे किंवा शरीरात पाणी कमी होणे. जास्त उष्णता, प्रचंड घाम येणे किंवा अतिउलटी-हागवण यामुळे आलेला अशक्तपणा.
चक्कर आलेली व्यक्ती अन्न किंवा पाणी स्वतःहून गळू शकत नाही. तोंडात टाकलेले पाणी पोटात जाण्याऐवजी थेट फुफ्फुसात जाऊ शकते. आणि ३० सेकंदात श्वास बंद होऊन व्यक्तीचा दम घुटू शकतो.
नाक किंवा छातीजवळ हात ठेवून व्यक्ती श्वास घेत आहे का ते तपासा. खांद्यावर थाप मारून प्रतिसाद तपासा. त्या व्यक्तीला जबरदस्ती बसवण्याचा प्रयत्न करू नका.
पाय वर उचलल्याने पायांमधील रक्तप्रवाह थेट मेंदूकडे होतो. मेंदूला योग्य प्रमाणात रक्त आणि ऑक्सिजन मिळाल्यामुळे व्यक्ती काही सेकंदातच पुन्हा भानावर येते.
भिंतीला टेकवून बसवल्यास मेंदूपर्यंत रक्त पोहोचत नाही.
डोळे बंद असताना तोंडात पाणी ओतल्यास ते श्वासमार्गात जाते.
रुग्णाभोवती गर्दी केल्याने त्याला खेळती हवा मिळत नाही.
जर व्यक्ती १ मिनिटात शुद्धीवर आली नाही, तर विलंब न करता त्वरित रुग्णवाहिका बोलवा किंवा जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. हे गंभीर वैद्यकीय लक्षण असू शकते.
ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
NEXT : ब्लँकेट्सना येतोय कुबट वास? घरीच करा 'हा' सोपा उपाय