Chetan Bodke
तुम्ही आम्ही आपण सर्वच दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने पिऊन करतो. अनेक जण ते न प्यायल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरूवातच करत नाहीत.
आज आम्ही तुम्हाला असे पेय सांगणार आहोत, जे तुम्ही पिऊन आपल्या दिवसाची सुरूवात करू शकता.
आपल्या दिवसाची सुरूवात चहा किंवा कॉफीऐवजी कोरफडीचा रस पिऊन करू शकता. सकाळी कोरफडीचा रस पिणे सर्वोत्तम मानला जातो.
कोरफडीच्या ज्युसचे सेवन केल्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. सोबतच पण स्किनवर ग्लो येतो आणि केसही दाट होतात.
पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोरफडीचा रस फायदेशीर ठरू शकतो.
कोरफडचा ज्यूस वजन नियंत्रणामध्ये ठेवण्यास मदत करते. कोरफडमध्ये जास्त अँटिऑक्सिडेंट पॉलीफेनॉल असतात.
कोरफडीमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. सकाळी उठल्यावर कोरफडीचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते.
कोरफडीच्या ज्यूसमुळे हिरड्या तर मजबूत राहतात, सोबतच तोंडातील दुर्गंधी दूर करण्याचे काम करते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.
NEXT: मिरची कापल्यानंतर हाताला जळजळ होतेय?; फॉलो करा ‘या’ टीप्स