Priya More
पायाचे तळवे अचानक गरम होतात, पायात जळजळ होते, पायाला मुंग्या येतात अशा समस्या अनेकांना भेडसावतात.
अनेक जण पाय गरम होण्याचा किंवा जळजळ होण्याचा संबंध थेट व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेशी जोडतात. पण फक्त यामुळेच ही समस्या होते असे नाही.
डायबिटीज, पेरिफेरल न्यूरोपॅथी, काही विशिष्ट औषधे, अति मद्यपान, थायरॉईडच्या समस्या आणि इतर वैद्यकीय परिस्थितींमुळे देखील पाय गरम होण्याची किंवा जळजळ होण्याची समस्या निर्माण होते.
पायांमध्ये जळजळ होण्याचे एक महत्त्वाचे कारण मज्जातंतूंचे नुकसान असू शकते.
व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेमुळे मज्जातंतूंवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे पायांना मुंग्या येणे, बधिरता येणे आणि काही जळजळ होऊ शकते.
व्हिटॅमिन बी ६ चे जास्त सेवन केल्यास म्हणजे त्याची औषधं खाल्ल्यास शरीरात व्हिटॅमिन बी ६ ची पातळी वाढते आणि पायात जळजळ होऊ शकते.
तुम्हाला डायबिजीच असेल तरी देखील तुमच्या पायात जळजळ होऊ शकते. डायबिटीज वाढल्यामुळे नसा आणि त्यांना जोडलेल्या लहान रक्तवाहिन्यांना नुकसान पोहचू शकते.
जर तुमचे पाय दुखत असतील, बधिरता वाटत असेल, पायात अशक्तपणा वाटत असेल, सतत जळजळ होत असेल तर दुर्लक्ष करू नका.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. साम टिव्ही याचं समर्थन करत नाही.