Chetan Bodke
वैश्विक कोरोना महामारीपासून सर्वांना खरंतर वेळोवेळी हात धुण्याची आणि चेहरा धुण्याची प्रचंड सवय लागली.
सारखे सारखे हात धुतल्यामुळे किंवा चेहरा धुतल्यामुळे स्कीनला इन्फेक्शन होऊ शकते.
स्वच्छता राखणे शरीरासाठी आवश्यक आहे. जर हिच स्वच्छता जास्त प्रमाणात ठेवली गेली तर त्वचेसंबंधित आजार उद्भवू शकते.
सारखा चेहरा धुतल्यामुळे स्किन कोरडी पडू शकते. सतत चेहरा धुतल्याने स्कीन ड्राय होऊन इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
अनेकांच्या मते, चेहरा वारंवार धुतल्यामुळे त्वचा उजळेल असे अनेकांना वाटते, पण त्यामुळे स्कीन ड्राय होते.
खरंतर चेहरा, सकाळी आणि संध्याकाळी धुवावा. त्यामुळे चेहेऱ्यावरील ग्लो कायम राहतो.
वेळोवेळी चेहरा धुतल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. त्यामुळे तुमचे वय जास्त दिसते.
चेहेऱ्यावर रॅशेजही मोठ्या प्रमाणावर दिसू शकतात. त्यासोबतच स्कीनची पीएच लेव्हलही हळूहळू कमी होऊ लागते.
त्वचा लाल होणे, त्वचेवर डाग पडणे, त्वचा कोरडी पडणे अशा अनेक समस्या आपल्या उद्भवतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांसोबत संपर्क साधा.