Alisha Khedekar
आपण प्रवासादरम्यान किंवा मनोरंजनासाठी इअरफोनचा वापर करतो. मात्र हे इअरफोन आपल्या श्रवणशक्तीवर परिणाम करतात. यावर वेळेचं उपाय करणे गरजेचे आहे.
दीर्घकाळ वापरामुळे कानात वेदना आणि तीव्र डोकेदुखी होऊ शकते.
मोठ्या आवाजाची सवय लागल्याने ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते.
रबर इअरफोनमुळे कानात घाण साचून इन्फेक्शन होऊ शकते. यामुळे कानात तीव्र वेदनेसारखे अनेक आजार होऊ शकतात.
मोठा आवाज कानाच्या पडद्यावर थेट परिणाम करतो. त्यामुळे ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते.
चुकीच्या फिटिंगमुळे कानात सूज आणि त्रास वाढतो. तसेच इअरबड्स वारंवार साफ न केल्याने त्याला घाणेरडा वास येऊ शकतो.
हेडफोनचा आवाज ६०% पेक्षा जास्त ठेवू नका. ६० पेक्षा अधिक आवाज ठेवल्याने कानाच्या पडद्यांना त्रास होऊ शकतो.
तासभरानंतर हेडफोन काढून कानांना विश्रांती द्या. जेणेकरून कानांना त्रास होणार नाही.