ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बाहेरगावी जाताना आपण आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी सोबत घेऊन जात असतो.
मात्र हिल स्टेशनवर जाताना कोणत्या महत्वपूर्ण गोष्टी सोबत ठेवल्या पाहिजे हे तु्म्हाला माहिती आहे का ?
चला तर जाणून घेऊयात कोणत्या गोष्टी बॅगेत ठेवाव्यात.
आपल्या कुंटुबातील सदस्यांचे नंबर एका लहान डायरीमध्ये तसेच ज्या ठिकाणी जात आहोत तेथील महत्वाच्या व्यक्तींचा नंबर तुमच्याकडे असावा.
फिरायला जाताना प्रथमोपचार किट सोबत असणे महत्वाचे आहे.
बॉडी वॉर्मर बॅगेत सहज मावते आणि वजनाने हलके असल्याने बॅगत वजनही जास्त होत नाही.
हिल स्टेशनवर फिरायला जाताना स्वेटरसोबत ठेवणे अत्यंत महत्वाचे असते.
अनेकवेळा थंडीपासून संरक्षण होण्यासाठी आपण फक्त स्वेटरसोबत ठेवतो मात्र मफल तसेच टोपीसोबत ठेवणे ही महत्वाचे असते.