Migraine : मायग्रेनचा त्रास सुरू होताच करा 'हा' घरगुती उपाय, सेकंदात वेदना गायब

Shreya Maskar

मायग्रेन

मायग्रेन हा एक प्रकारचा न्यूरोलॉजिकल आजार असून यात आणि डोकेदुखी होते. तसेच मळमळ, उलटी, चक्कर, प्रकाश किंवा मोठ्या आवाजाची संवेदनशीलता ही मायग्रेनची लक्षणे आहेत.

Migraine | pinterest

विश्रांती घ्या

मायग्रेनचा त्रास तुम्हाला वारंवार होऊ नये म्हणून शक्य असल्यास अंधाऱ्या, शांत खोलीत आराम करा, थोडी झोप घ्या. प्रकाश आणि मोठा आवाज मायग्रेनची लक्षणे वाढवू शकतात.

take rest | pinterest

पाणी प्या

डिहायड्रेशन हे काही लोकांमध्ये डोकेदुखी किंवा मायग्रेनचा ट्रिगर ठरू शकते. त्यामुळे दिवसभर पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे. बराच वेळ उपाशी राहणे किंवा जेवणाच्या वेळा अनियमित होणार नाही याची काळजी घ्या.

drink water | pinterest

श्वसनाचे व्यायाम

ताण आणि स्ट्रेस हे मायग्रेनला ट्रिगर करतात, त्यामुळे हळू-हळू दीर्घ श्वास घेणे, ध्यान करा. ताण कमी करण्यास मदत मिळते.

Breathing exercises | pinterest

झोपेची वेळ

खूप कमी किंवा अनियमित झोप काही लोकांमध्ये मायग्रेन वाढवू शकते. दररोज शक्यतो ठराविक वेळी झोपणे आणि उठणे फायदेशीर ठरू शकते.

sleep time | pinterest

थंड पाण्याची पट्टी

कपाळावर किंवा मानेवर कापडात गुंडाळलेला थंड पॅक काही मिनिटे ठेवू शकता. थंडावा वेदना कमी करण्यास मदत करू शकतो.

Cold water bar | pinterest

स्क्रीन टाइम कमी करा

मोबाइल, टीव्ही किंवा कॉम्प्युटरचा सतत वापर आणि तेज प्रकाश त्रास वाढवू शकतो. मायग्रेन सुरू झाल्यावर स्क्रीनपासून दूर राहून डोळ्यांना विश्रांती द्या.

Reduce screen time | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : सकाळी रिकाम्यापोटी 'या' बिया लिंबू पाण्यात मिसळून प्या; वजन, शुगर अन् बीपी कायम राहील कंट्रोलमध्ये

Lemon Water | AI PHOTO
येथे क्लिक करा...