ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
यावर्षी येत्या २६ तारखेला हरतालिका व्रताचा शुभ मुहुर्त आहे.
यादिवशी प्रामुख्याने स्त्रिया व अविवाहित कुमारिका उपवास करतात.
हा उपवास का केला जातो, यामागची पौराणिक कथा आज आपण जाणून घेणार आहोत.
माता पार्वतीची भगवान शंकराशी विवाह करण्याची तीव्र इच्छा होती.
पण पार्वती मातेच्या वडिलांना हे मान्य नव्हते. म्हणून त्यांनी पार्वतीचे लग्न तिच्या इच्छेविरूद्ध भगवान विष्णूशी ठरवले.
पार्वतीला तपश्चर्या पूर्ण करता यावी. म्हणून तिच्या मैत्रिणींनी तिला वडिलांच्या घरातून पळवून घनघोर जंगलात नेले.
तिथे पार्वतीने अनेक वर्षे अन्नपाण्याचा त्याग करत कठोर तपश्चर्या केली. या दिवसालाच हरतालिका तृतीया म्हटले जाते.
तेव्हा पासूनच विवाहित स्त्रिया पतीच्या दिर्घायुष्यासाठी तर, अविवाहित कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी हा व्रत करतात.
'हर' म्हणजे पार्वतीच्या 'मैत्रिणीने पार्वतीचे केलेले हरण' व 'तालिका' म्हणजे 'सखी किंवा मैत्रिण'.