Shreya Maskar
रायगड जिल्ह्यातील 'दक्षिण काशी' म्हणून ओळखला जाणारा हरिहरेश्वर बीच वसलेला आहे. कोकण किनारपट्टीवरील एका किनारी शहरात हे ठिकाण आहे.
हरिहरेश्वर समुद्र हरिहरेश्वर, हर्षिनाचल आणि पुष्पाद्री या तीन टेकड्यांच्या पायथ्याशी, जिथे सावित्री नदी अरबी समुद्राला मिळते, तिथे वसलेला आहे.
हरिहरेश्वर बीचला गेल्यावर निसर्ग सौंदर्य आणि आध्यात्मिक महत्त्व यांचा सुरेख संगम पाहायला मिळेल.
हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर भगवान शिवाचे भव्य हरिहरेश्वर मंदिर आहे. येथे तुम्हाला शांत आणि प्रसन्न वातावरण अनुभवता येईल.
हरिहरेश्वर बीच मुंबईपासून सुमारे २०० किमी आणि पुण्यापासून १९० किमी अंतरावर आहे. हरिहरेश्वर बीचला जाण्यासाठी माणगाव हे जवळचे स्टेशन आहे. त्यामुळे मुंबई टू माणगाव ट्रेन प्रवास करा. माणगाव स्थानकावर पोहोचल्यानंतर टॅक्सी, रिक्षा किंवा एसटीने हरिहरेश्वरपर्यंत पोहचा.
पावसाळ्यात येथे हिरवेगार वातावरण अनुभवता येईल. तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूटचा आनंद घेऊ शकता.
संध्याकाळी निवांत फेरफटका मारायला हरिहरेश्वर बीचवर नक्की जा. तुम्हाला सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळेल. हरिहरेश्वर बीचला गेल्यावर स्पीड बोट आणि वॉटर स्कूटर राईड यांचा आनंद घेता येतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.