Manasvi Choudhary
महाराष्ट्र राज्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. आज आम्ही तुम्हाला पर्यटकांचे आकर्षण असलेला हरिहर किल्ल्याविषयी सांगणार आहोत.
हरिहर किल्ल्याला हर्षगड या नावाने देखील ओळखले जाते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला टेकड्यांवर हरिहर किल्ला आहे ज्याला पश्चिम घाट असे देखील ओळखले जाते.
घोटी आणि नाशिक शहरापासून ४० कि. मी. अंतरावर हरिहर किल्ला आहे. हरिहर किल्ला डोंगरावर १७० मीटर उंचीवर रूंद आहे. ११७ पायऱ्या या किल्ल्याला आहेत.
किल्ल्याच्या शिखरावर पोहचल्यानंतर हनुमान आणि शिवचे मंदिरेही दिसतील. मंदिराजवळ एक तलाव आहे.
हा किल्ला सह्याद्रीच्या कुशीत, पश्चिम घाटाच्या टेकड्यांवर वसलेला आहे. हरिहर किल्ल्याची ११७ पायऱ्यांची उभी चढण हे त्याचे मुख्य आणि सर्वात मोठे आकर्षण आहे.
हा किल्ला त्याच्या अनोख्या पायऱ्यांमुळे ट्रेकर्समध्ये खूप लोकप्रिय आहे.किल्ल्यावर चढताना ४-५ प्रवेशद्वारे लागतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.