Siddhi Hande
आतापर्यंत तुम्ही मिरचीचा, लसूणचा ठेचा बनवला असेल. तुम्ही कधी हरभऱ्याचा ठेचा खाल्ला आहे का?
हरभऱ्याचा ठेचा हा खूप झणझणीत आणि चविष्ट असतो.
हरभऱ्याचा ठेचा बनवण्यासाठी सर्वप्रथम हरभरा आणि लसूण भाजून घ्या. त्यानंतर हरभरा आणि लसूणची मिक्सरमध्ये जाडसर पेस्ट करा.
यानंतर एका पॅनमध्ये तेल टाकून त्यात जिरं, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट आणि कांदा परतून घ्या.
कांद्यात हिरव्या मिरच्या मिक्स करा. त्यानंतर त्यात हरभऱ्याची पेस्ट मिक्स करुन घ्या.
यात चवीनुसार मीठ, कोथिंबीर टाकून पाच मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या.