Hara Bhara Kabab : हिवाळ्यात पुरवा जिभेचे चोचले, झटपट बनवा हरा भरा कबाब

Shreya Maskar

हरा भरा कबाब

हरा भरा कबाब बनवण्यासाठी पालक, मटार, उकडलेले बटाटे, आले, हिरवी मिरची, ब्रेडक्रंब, बेसन, हळद, गरम मसाला, वेलची पावडर, कैरी पावडर, कोथिंबीर, तेल, मीठ इत्यादी साहित्य लागते.

Hara Bhara Kabab | yandex

पालक

चवदार हरा भरा कबाब बनवण्यासाठी सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवून गरम पाण्यात उकळवून बारीक तुकडे करून घ्या.

Spinach | yandex

मटार

आता एका पॅनमध्ये तेल, उकडलेले मटार , पालक आणि चवीनुसार मीठ घालून छान परतून घ्या.

Peas | yandex

कोथिंबीर

मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात कोथिंबीर, हळद, हिरवी मिरची, उकडलेले बटाटे आणि आले मिक्स करा.

Coriander | yandex

कैरी पावडर

त्यानंतर या मिश्रणात गरम मसाला, कैरी पावडर, वेलची पूड, भाजलेले बेसन, ब्रेडचा चुरा घालून सर्व मिश्रण छान एकजीव करा.

raw mango powder | yandex

कबाब

आता या मिश्रणाचे छोटे गोळे करून त्याला कबाबचा आकार द्या.

Kabab | yandex

तेलात तळा

तयार झालेले हरा भरा कबाब तेलात खरपूस तळून घ्या.

oil | yandex

पुदिन्याची चटणी

पुदिन्याच्या चटणीसोबत हरा भरा कबाबचा आस्वाद घ्या.

Mint Chutney | yandex

NEXT : हिवाळ्यात मेथीच्या भाजीत घाला 'हा' एक पदार्थ, लहान मुल मिनिटांत करतील फस्त

methi veg | google
येथे क्लिक करा...