Chetan Bodke
बॉलिवूडची काँट्रोव्हर्सी क्वीन अभिनेत्री पूनम पांडेचा आज (११ मार्च) ३३ वा वाढदिवस आहे.
पूनम पांडे अनेकदा आपल्या अभिनयामुळे नाही तर, विचित्र पब्लिसिटी स्टंटमुळे चर्चेत राहणारा चेहरा आहे.
आज पूनमच्या वाढदिवसानिमित्त ती कोणकोणत्या वादामुळे सर्वाधिक प्रकाशझोतात आलेली जाणून घेऊया...
२०११ मध्ये पूनमने जर, भारत वर्ल्डकप जिंकल्यावर मी स्वतःचे कपडे उतरवेल, असे खळबळजनक भाष्य केले होते.
पूनम पांडेचा बाथरूममधील एक बोल्ड व्हिडीओ लीक झाला होता. त्यामुळे तिच्यावर सर्व स्तरातून टीका केली होती.
पूनमने स्वतःच्या नावाचा ॲप लॉन्च केला होता. 'पांडे ॲप'वर तिने तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे काही तासांतच गुगलने ॲप प्ले स्टोअरवरून हटवले होते.
अभिनेत्रीने कोव्हिड- १९मध्ये, सेफ्टी प्रोटोकॉलचे उल्लंघन केले होते. त्यामुळे तिच्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली होती.
पूनम आणि सॅम बॉम्बेचं २०२० मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर हनिमूनसाठी गोव्यात असताना, पूनम पांडेने सॅमविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करत एफआयआर दाखल केली होती.
२ फेब्रुवारीला पूनम पांडेने गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे निधन झाल्याचे खोटं वृत्त दिले होते. यामुळे ती प्रचंड ट्रोल झाली होती.