मारुतीरायाला शेंदूर का अर्पण करतात? जाणून घ्या कारण

Yash Shirke

मारुती

हनुमान म्हणजे मारुतीरायाला शेंदूर अर्पण करतात. मंदिरात मारुतीच्या मूर्ती समोर शेंदूर चढवला जातो.

Maruti | x

शेंदूर

पण मारुतीरायाला शेंदूर का अर्पण केला जातो? तुम्हाला ठाऊक आहे का?

Dutondya Maruti | x

हनुमान

एका प्रचलित कथेनुसार एकदा हनुमानाला भूक लागली, तेव्हा ते सीता मातेकडे गेले.

Hanuman Sita | x

कुंकू

सीता मातेने कुंकू म्हणजेच शेंदूर/ सिंदूर लावताना मारुतीरायाने पाहिले आणि कुंकू लावण्यामागचे कारण विचारले.

Sita | x

रामचंद्र

प्रभू रामचंद्राच्या उदंड आयुष्यासाठी मी कुंकू लावते, असे सीता माता म्हणाल्या.

Ram sita | x

भक्ती

जर चिमूटभर शेंदूरने रामचंद्राचे आयुष्य वाढत असेल, तर मी पूर्ण शरीरावर शेंदूर लावून घेतले, तर प्रभू राम अमर होतील असे मारुतीरायाला वाटले.

Maruti Sita | x

शेंदूर

हनुमंताने शरीरभर शेंदूर लावून घेतले. तेव्हापासून मारुतीरायाच्या मूर्तीला शेंदूर लावण्याची प्रथा सुरु झाली अशी आख्यायिका आहे.

Hanumant | x

टीळा

हनुमानाला शेंदूर अर्पण केल्याने जेव्हा भक्त शेंदूरने टीळा लावतात तेव्हा दोन्ही डोळ्यांमधील स्थित ऊर्जा केंद्र सक्रिय होते असे म्हटले जाते.

PawanPutra | x

दगाफटका करुन जीवानिशी मारलं अन्...; शिवरायांच्या थोरल्या भावाचा इतिहास तुम्ही वाचलात का?

Sambhaji shahaji bhosale.jpg | Wikipedia
येथे क्लिक करा.