Saam Tv
हनुमान जयंती वर्षातून दोनदा साजरी केली जाते. यंदा हनुमान जन्मोत्सव १२ एप्रिल २०२५ रोजी म्हणजेच येत्या शनिवारी आहे.
भारतात हा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. अशीच काही मुंबईजवळची प्रसिद्ध हनुमान मंदिरांची नावे आपण जाणून घेणार आहोत.
मुंबईतील परळच्या हनुमान मंदिरात हनुमानाचा जन्मोत्सव मोठ्या धाटात साजरा केला जातो.
हनुमानाचा फुलांनी सजवलेला रथ, कीर्तन अशा सगळ्या गोष्टींनी लालबाग येथे जयंती साजरी केली जाते.
घाटकोपरमधील राम हनुमान मंदिरात मोठ्या थाटात हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो.
रमाबाई नगर परिसरात असलेल्या हनुमान मंदिरात कीर्तन, प्रवचन, पालखी, मिरवणुक आणि महाप्रसाद दिला जातो.
संपुर्ण परिसरात मेळावा आणि पालखी मिरवणुक ही कांदिवली हनुमान मंदिराच्या परिसरात असते.
डोंबिलीतलं हनुमान मंदिर हे फडके रोड जवळ आहे.
विक्रोळी पार्कसाईट येथे हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या धाटात पार पाडला जातो.
शीतला देवी हनुमान मंदिर हे दहिसरमधील मोठे आणि आकर्षक मंदिर आहे.