ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शरीर निरोगी ठेवण्यासाठी पोषक घटकांची भूमिका महत्त्वाची असते.शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता असल्यास अनेक आजरांचा धोका वाढतो.
तुम्हाला माहीत आहे का शरीरात कोणत्या व्हिटॅमिन्सची कमतरता असल्यास हाथ थरथरतात, जाणून घ्या.
व्हिटॅमिन बी १२ नर्वस सिस्टमला सुधारण्यास आणि नवीन ब्लड सेल्स तयार कऱण्याचे काम करतात. तसेच शरीराला उर्जा प्रदान करण्याचे काम देखील करते.
जर तुमचे हात थरथरत असतील तर याचा अर्थ तुमच्यात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता आहे. म्हणून, व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता जाणवू यासाठी व्हिटॅमिन बी १२ युक्त पदार्थ खा.
व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरता असल्यास दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केले पाहिजे. यासाठी तुम्ही चीज, दही आणि बटरचे सेवन करू शकता.
व्हिटॅमिन बी १२ व्यतिरिक्त, मशरूममध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, सेलेनियम, झिंक, प्रथिने आणि फायबर असतात, जे तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता पूर्ण करू शकतात.
व्हिटॅमिन बी १२ युक्त पदार्थ मर्यादित प्रमाणात खा. जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्याला हानि पोहचू शकते.