Saam Tv
हिवाळ्यात अनेक महिलांचे केस खूप जास्त कोरडे होतात. त्यामुळे केस गळतात.
हवेतील आर्द्रतेचा अभाव, गरम पाण्याने केस धुणे, तसेच चुकीच्या प्रोडक्टचा वापर करणे. हे टाळण्यासाठी काही घरगुती उपाय उपयुक्त ठरतात ते पुढील प्रमाणे असतील.
आठवड्यातून दोन वेळा कोमट खोबरेल तेल, बदाम तेल, किंवा जोजोबा तेलाने मसाज करा. यामुळे केसांना पोषण मिळते आणि कोरडेपणा कमी होतो.
दही आणि खोबरेल तेल एकत्र करून केसांवर लावल्याने खोलवर मॉइश्चरायझिंग होते, केस गुळगुळीत होतात, आणि कोंडाही कमी होतो.
अवोकाडो आणि दही यांची पेस्ट करून ती केसांना लावा. यातील व्हिटॅमिन बी आणि ई केसांचे पोषण करतात आणि मऊ करतात.
अंड्यातील प्रथिने केसांना मजबुती देतात. अंड्याचा मास्क लावून केसांची चमक वाढवता येते.
केसांचा गुंता काढण्यासाठी मोठ्या दातांचा कंगवा वापरल्याने तुटण्याची शक्यता कमी होते.
पोषणयुक्त आहारामुळे केस निरोगी राहतात. आहारात ओमेगा-3 फॅटी ऍसिड आणि प्रथिनांचा समावेश ठेवा.