Saam Tv
युपीच्या प्रयागराज जिल्ह्यात यंदाचा महाकुंभ मेळा पार पडणार आहे. हा केवळ धार्मिक उत्सव नाही तर भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा जिवंत पुरावा आहे.
हरिद्वार, उज्जैन, प्रयागराज आणि नाशिक येथे दर तीन वर्षांनी भरणाऱ्या मेळ्याला कुंभमेळा म्हणतात. तसेच १४४ वर्षांनी होणाऱ्या मेळाव्याला महाकुंभ मेळा म्हणतात.
उत्तर प्रदेशात गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांचा संगम होतो. त्याच ठिकाणी पवित्र पाण्यात डुबकी मारल्याने पाप धुऊन मोक्ष प्राप्त होतो, अशी भक्तांची श्रद्धा आहे.
प्रत्येक वेळेस जगभरातून तब्बल 450 दशलक्ष भाविक तेथे येतात. धार्मिक स्नान, प्रार्थना आणि धार्मिक प्रवचनांमध्ये ते सहभागी होतात.
तिथे राहण्यासाठी भाविकांचे आयोजन करण्यात येते. त्यांना भोजन, स्नान, झोपण्यासाठी योग्य सुविधा देण्यात येतात. यासाठी यंदा 6,500 कोटी रुपयांचे बजेट असणार आहे.
१३,१४,२९ जानेवारी २०२५ या तारखांना तुम्ही स्नान करू शकता.
भाविक दरवेळेस नद्यांच्या काठावर विविध पूजा, हवन आणि इतर धार्मिक विधी करतात. तिथे पहाटेची आरती आणि संध्याकाळच्या आरतीला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
महाकुंभ मेळ्यात पारंपारिक नृत्य, संगीत, नाट्य यांसारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.