Shruti Vilas Kadam
हेअर स्प्रेमध्ये असलेल्या अल्कोहोलमुळे केसांतील नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि केस कोरडे, राठ व सहज तुटणारे होतात.
वारंवार स्प्रे लावल्याने टाळूवर केमिकल्सचा थर जमा होतो, ज्यामुळे खाज, लालसरपणा किंवा जळजळ निर्माण होऊ शकते.
रोज स्प्रे लावल्याने केसांवर कडकपणा येतो. कॉम्बिंग करताना केस तुटतात आणि हळूहळू गळण्याचे प्रमाण वाढते.
जास्त स्प्रेचा वापर केल्याने केसांचा नैसर्गिक ग्लो कमी होतो आणि केस निष्प्रभ दिसू लागतात.
स्प्रेचा थर टाळूमध्ये जमा झाल्याने पोअर्स बंद होतात आणि नवीन केसांची वाढ कमी होते.
वारंवार स्प्रेचा लेयर बसल्याने केस जड आणि स्टिकी वाटतात, ज्यामुळे स्टाइलिंगही नीट होत नाही.
हेअर स्प्रेतील केमिकल्स दीर्घकाळ वापरत राहिल्यास केसांची मजबुती, जाडी आणि टेक्स्चर खराब होते.