ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपले केस लांब आणि दाट असावे असे प्रत्येक महिलेला वाटते.
परंतु सध्या धूळीमुळे केस खराब होतात. केसात कोंडा होतो.
केसात कोंडा होऊ नये यासाठी काही घरगुती उपाय करायला हवे.
आठवड्यातून दोनदा केसांची तेलाने मालिश करावी.
केस धुण्यासाठी कंडिशनरयुक्त शॅम्पू वापरा.
तसेच केस धुताना केसातील शॅम्पू पूर्णपणे निघून जाईन याची काळजी घ्या. केसात शॅम्पू राहिल्याने कोंडा होतो.
केस धुताना शिकेकाईचा वापर करा. कडुलिंबाच्या पानांचे पाणीदेखील कोंडा घालवण्यासाठी उपयुक्त ठरते.
केस सुकवण्यासाठी सतत हेअर ड्रायरचा वापर करु नका.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.