Sakshi Sunil Jadhav
महिलांचे सौंदर्य वाढवण्यासाठी फक्त चेहराच नाहीतर केसही खूप महत्त्वाचे असतात. बऱ्याचदा केसांच्या लांबीने महिलेचं सौंदर्य जास्त खुलून दिसतं हे तुम्ही पाहिलच असेल.
बऱ्याचदा महिला जेव्हा केस कापतात तेव्हा ते वाढलेले दिसत नाहीत. कधीकधी केसांच्या गळतीमुळेही केस न वाढण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं.
तज्ज्ञांच्या मते बदलत्या लाइफस्टाइलमुळे केसांना आवश्यक पोषण मिळत नाही. त्यासाठी आहारात काही बदल करणं खूप गरजेचं आहे.
जंक फूड टाळा, भाज्या खा, ड्रायफ्रुट्स, डाळी यांचा आहारात समावेश केल्याने नैसर्गिकरित्या केसांची वाढ होऊ शकते.
डाएटमध्ये चिया सिड्स सेवन केल्याने त्यातले अँटी ऑक्सिडेंट्स, ओमेगा थ्री फॅटी अॅसिड केसांच्या मुळांना मजबूत बनवतात आणि केसांची वाढ होते.
अवोकाडोचे हेअर मास्क तुम्ही वापरत असाल तर केसांना व्हिटॅमिन मिळतं. तर केस शायनी सुद्धा दिसतात.
तुम्ही कॉटनच्या उशीचे कवर वापरत असाल तर केसांना घर्षण जाणवतं. त्याने केस वाढत नाहीत आणि तुटतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.