Blood Sugar: शुगर वाढलीये? घरातल्या या 6 औषधी वनस्पती करतील कमाल; डॉक्टरही सांगतात फायदे

Sakshi Sunil Jadhav

वाढती समस्या

डायबेटीज वाढणं अत्यंत धोकादायक असतं. पण ही समस्या आजकाल सर्वांमध्येच आढळते. योग्य आहार, रोजच्या रोज व्यायाम आणि लाइफस्टाइलमधल्या बदलांमुळे काही नैसर्गिक औषधी वनस्पतींनी शुगर नियंत्रणात ठेवता येऊ शकते.

blood sugar control

जबरदस्त फायदे

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या या वनस्पतींचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून केला जातोय. जाणून घ्या त्यांचे फायदे.

diabetes management

मेथी (Fenugreek)

मेथीमध्ये विद्रव्य तंतू (Soluble Fiber) भरपूर प्रमाणात असतात. हे तंतू शरीरातल्या साखरेचं शोषण कमी करतात आणि इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यासाठी मदत करतात. मेथीच्या बिया किंवा मेथी पावडरचा आहारात समावेश करता येतो.

fenugreek benefits

दालचिनी (Cinnamon)

दालचिनी इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. दररोज अर्धा चमचा दालचिनी घेतल्याने जेवणानंतर रक्तातील साखर झपाट्याने वाढण्याचा धोका कमी होतो.

cinnamon for diabetes

कारल्याचा रस (Bitter Gourd)

कारल्यामध्ये इन्सुसिनसारखे कार्य करणारे काही नैसर्गिक घटक असतात. रिकाम्या पोटी कारल्याचा रस पिण्याची पद्धत अनेक ठिकाणी पारंपरिक उपाय म्हणून वापरली जाते.

Bitter Gourd for diabetes

तुळस (Holy Basil)

तुळस शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करायला मदत करतो. तसेच स्ट्रेबस कमी करून रक्तातल्या साखरेची पातळी संतुलित ठेवण्याचं काम करतो.

Holy Basil for diabetes

कोरफड (Aloe Vera)

कोरफडीचा गर किंवा रस साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकतो. याशिवाय पचनसंस्था आणि आतड्यांच्या आरोग्यासाठीही तो फायदेशीर मानला जातो.

Aloe Vera

बर्बेरिन (Berberine)

इंडियन बार्बेरीसारख्या वनस्पतींमध्ये आढळणारे बर्बेरिन हे सक्रिय संयुग इन्सुलिन सुधारण्यास मदत करते. त्याने यकृतातले जास्तीचे ग्लुकोज कमी होत जाते.

Berberine

टीप

वरील माहिती सामान्य जागरूकतेसाठी आहे. कोणताही घरगुती उपाय किंवा सप्लिमेंट वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

diabetic health tips

NEXT : वयाच्या तिशीतच या ५ गोष्टींचं पालन करा, जगातल्या यशस्वी व्यक्तींमध्ये तुमचीही होईल गणना

Life Success
येथे क्लिक करा