Shruti Vilas Kadam
केसांना भरपूर तेल लावल्याने अधिक फायदा होतो, असा समज आहे. मात्र गरजेपेक्षा जास्त तेल लावल्यास केस चिकट होऊ शकतात आणि ते धुण्यासाठी जास्त शॅम्पू वापरावा लागू शकतो.
टाळूवर तेल लावताना केसांची मुळं जोरात चोळणे किंवा नखांचा वापर करणे टाळा. बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने मसाज करणे योग्य आहे.
तेल लावल्यानंतर लगेच केस विंचरल्यास केस तुटण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे तेल लावण्यापूर्वीच केसांमधील गुंता हलक्या हाताने सोडवावा.
तेल लावल्यानंतर ते खूप तास किंवा रात्रभर ठेवण्याची गरज नसते. काही तज्ज्ञांच्या माहितीनुसार, केस धुण्याच्या आधी मर्यादित वेळ तेल लावणे पुरेसे ठरू शकते.
दररोज किंवा वारंवार तेल लावण्याऐवजी केसांच्या गरजेनुसार आठवड्यातून एक किंवा दोन वेळा तेल लावण्याची सवय ठेवू शकता.
तेलाने मसाज केल्यानंतर केस खूप घट्ट बांधल्यास केसांच्या मुळांवर ताण येऊ शकतो. त्यामुळे केस सैल ठेवणे चांगले.
प्रत्येकाच्या केसांचा आणि टाळूचा प्रकार वेगळा असतो. त्यामुळे आपल्या केसांना आणि टाळूला योग्य असे तेल निवडणे महत्त्वाचे आहे. चुकीचे तेल काही लोकांना त्रासदायक ठरू शकते.