केस गळतीवर १ नंबर घरगुती उपाय! कढीपत्ता पावडरचा 'असा' करा वापर

Manasvi Choudhary

केस गळतीची समस्या

केस गळती ही सध्या महिलांची सर्वात मोठी आणि डोकेदुखी ठरलेली समस्या आहे. वयाची विशी ओलांडलेले तरुण असोत की वृद्ध महिला, प्रत्येक जण केस गळण्याच्या समस्येने त्रस्त आहे.

Hair Fall Control Tips | Pintrest

डोकेदुखी वाढवणारा त्रास

वाढते प्रदूषण, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, गोळ्या -औषधांचा परिणाम केसांवर होतो आणि केस गळती सुरू होते. कधी कधी तुम्ही केसांसाठी वापणाऱ्या प्रोडक्टसचा देखील परिणाम असतो.

Hairstyle | Pintrest

पार्लरची ट्रिटमेंट

अनेक महिला यासाठी पार्लरमध्ये जाऊन महागड्या हेअर ट्रीटमेंट्स घेतात. हजारो रुपये खर्च करतात परंतु याचा तात्पुरता फायदा होतो आणि नंतर केस पुन्हा गळतात.

hair fall | yandex

घरगुती उपाय

मात्र तुम्हाला माहितीये का? घरगुती सोप्या उपायांनी तुम्ही केस गळती कमी करण्यास मदत करू शकता. काय हा उपाय आहे ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Hair Fall Control Tips

पावडर बनवण्याची सोपी पद्धत

सर्वातआधी गॅसवर एका पॅनमध्ये कढीपत्ता, मेथी दाणे, काळे तीळ आणि जास्वंदीची पाने हलकेसे भाजून घ्या.

हे भाजलेले साहित्य थंड करा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करा.

या मिश्रणात आवळा पावडर मिक्स करून तुम्ही ही पावडर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा.

Curry Leaves for Hair

पावडर कशी प्यायची?

घरच्या घरी तुम्ही कढीपत्ता, मेथी, आवळा आणि काळे तीळ यांची पावडर तयार करून त्याचे ड्रिंक प्या.

कोमट पाण्यामध्ये कढीपत्ता पावडर मिक्स करून तुम्ही हे पाणी सकाळी प्या. ताकमध्ये देखील ही पावडर मिक्स करून तुम्ही पिऊ शकता.

Curry Leave water

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: मांड्यांवरची चरबी मेणासारखी वितळेल! वजन कमी करण्यासाठी रोज प्या 'काळ्या चण्यांचे' गरमागरम सूप

Weight Loss Soup
येथे क्लिक करा...