Hair Dye Side Effects: तुम्हीपण पांढरे केस लपवण्यासाठी हेअर डाय करता? मग होऊ शकतात डोळ्यांवर गंभीर परिणाम

Shruti Vilas Kadam

डोळ्यांना जळजळ होऊ शकते

हेअर डाय चुकून डोळ्यांच्या संपर्कात आल्यास जळजळ, लालसरपणा, आग होणे आणि पाणी येणे यांसारख्या समस्या होऊ शकतात.

long term effects of hair dye chemicals | Google

कॉर्नियाला इजा होण्याचा धोका

डायमधील रसायनांचा डोळ्यांशी संपर्क आल्यास कॉर्नियाला नुकसान होऊ शकते. गंभीर परिस्थितीत दृष्टीवरही परिणाम होण्याची शक्यता असते.

eye infection | google

PPD मुळे ॲलर्जी होऊ शकते

अनेक हेअर डायमध्ये आढळणारे PPD (Para-phenylenediamine) हे ॲलर्जीक प्रतिक्रिया निर्माण करणारे प्रमुख घटक आहे. त्यामुळे खाज, लालसरपणा किंवा सूज येऊ शकते.

Hair Colour

टाळूवर जळजळ आणि पुरळ येऊ शकते

डायच्या रसायनांमुळे टाळू, कपाळ आणि मानेजवळ त्वचेची ॲलर्जी किंवा संपर्कजन्य त्वचारोग होऊ शकतो.

Hair Dye | pinterest

केस गळण्याची समस्या उद्भवू शकते

काही व्यक्तींमध्ये हेअर डायच्या रसायनांमुळे त्वचेची प्रतिक्रिया किंवा केसांशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

Hair Colour

डाय वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा

प्रत्येक वेळी डाय वापरण्यापूर्वी त्वचेवर छोट्या भागात पॅच टेस्ट करणे महत्त्वाचे आहे. खाज किंवा पुरळ आल्यास तो डाय वापरू नये.

Hair Colour

डोळ्यांच्या भुवया आणि पापण्यांवर डाय लावू नका

हेअर डायचा वापर भुवया किंवा पापण्यांना रंगवण्यासाठी करू नये. डोळ्यांना गंभीर इजा होऊन दृष्टी जाण्याचा धोका असू शकतो.

Hair Care | Saam tv

Diabetes Healthy Food: मूग, तूर, हरभरा डाळ; डायबिटीजच्या रुग्णांनी कोणते कडधान्ये खावीत?

Diabetes Healthy Food | Saam TV/ AI
येथे क्लिक करा