ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लींबाचा रस केसांवर डायरेक्ट लावल्याने केस ड्राय आणि कमजोर होऊ शकतात.
लींबूच्या आम्लयुक्त गुणधर्मांमुळे केसांमधील ओलावा कमी होऊ शकतो, ज्यामुळे केस तुटायला लागतात.
केसांवर जास्त गरम तेल वापरल्याने केसांच्या मुळांना नुकसान पोहोचू शकते.
गरम तेलामुळे स्कॅल्पची संवेदनशीलता वाढू शकते आणि केसांच्या मुळांना नुकसान पोहोचू शकते.
शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर लावू नये. यामुळे केस गुंतागुंतीचे होऊन तुटू शकतात.
हेअरस्प्रे आणि स्टाइलिंग प्रोडक्ट केसांना ड्राय करू शकतात आणि अल्कोहोल-आधारित उत्पादने केसांमधील नैसर्गिक ओलावा काढून टाकतात.
गरम उर्जा देणारे प्रोडक्ट्स केसांवर वापरु नये. जसे की, स्ट्रेटनर, कर्लर या गोष्टी केसांना कमजोर करतात. त्यामुळे त्याचा वापर कमी करावा.
तुमच्या केसांच्या काळजीसाठी योग्य प्रोडक्ट्स निवडा आणि नियमितपणे केसांची काळजी घ्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.