ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
डोळ्यांमध्ये काजळ लावण्याची परंपरा खुप वर्ष जुनी आहे. बाळाच्या जन्मानंतर सुध्दा डोळ्यात काजळ लावले जाते.
डोळ्यांमध्ये काजळ लावण्याचे फायदे आणि तोटे याबद्दल तुम्ही कधी जाणून घेतले आहे का? मग जाणून घ्या.
काजळ लावल्याने डोळे सुंदर आणि मोठे दिसू लागतात. लहान मुलांपासून ते महिलांपर्यंतच्या डोळ्यांवर काजळचा परिणाम दिसून येतो.
काजळ घरी बनवलेले असेल तर, ते डोळ्यांना थंडावा देते. याने डोळ्यांना जळजळ आणि खाज येत नाही.
जर तुम्ही डोळ्यांमध्ये काजळ लावले, तर त्यात धूळ किंवा घाण जात नाही. यामुळे डोळे स्वच्छ राहतात.
जर तुम्हाला खूप थकवा आला असेल किंवा तुमची झोप अपुरी झाली असेल, तर काजळ लावल्याने डोळ्यांचा थकवा कमी होण्यास मदत होते आणि डोळे अधिक तेजस्वी दिसतात.
जर तुम्ही बाजारात मिळणारे काजळ वापरत असाल, तर तुम्हाला डोळ्यांच्या इंफेक्शनचा धोका असू शकतो. त्यात अनेक प्रकारचे केमिकल असतात.
केमिकलयुक्त काजळाचा अतिवापर केल्याने डोळ्यांमधील वॉटरी ग्लॅंड म्हणजेच अश्रू नलीका बंद होऊ शकतात.
अति प्रमाणात काजळ लावल्याने दृष्टीवरही परिणाम होऊ शकतो. यामुळे दृष्टी धूसर होऊ शकते किंवा जवळची आणि दूरची दृष्टी अस्पष्ट होऊ शकते.
तुम्हाला काजळ रोज लावायचे असेल तर, काजळ घरी बनवा. घरी बनवलेले काजळ तुम्ही ब्रशच्या मदतीने लावू शकता. ते दिर्घकाळ टिकून राहिल.