ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कडक ऊन, घामामुळे आणि वातावरणातील आर्द्रतेचा केसांवर थेट परिणाम होत असतो. उन्हाळ्यात केसांचे आरोग्य जपण्यासाठी आणि गळती रोखण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
उन्हाळ्यामुळे टाळूवर सतत घाम येतो, यामुळे त्वचा तेलकट होते. या तेलकटपणावर धूळ आणि प्रदूषण पटकन चिकटत असते. यामुळे केसांची मुळे कमकुवत होत असतात.
प्रखर उन्हामुळे केसांमधील नैसर्गिक प्रथिने नष्ट होतात, यामुळे केस मुळापासून कमकुवत होऊन गळू लागतात.
वाढते तापमान केसांमधील नैसर्गिक ओलावा शोषून घेते. केसांचा सर्वात बाहेरील संरक्षणात्मक थर, ज्याला आपण 'क्युटिकल' म्हणतो, तो उष्णतेमुळे खराब होतो. तेव्हा केस कोरडे, निस्तेज आणि 'फ्रिजी' दिसू लागतात.
केसांचेही उन्हापासून संरक्षण करणे गरजेचे आहे. बाहेर पडताना टोपी, स्कार्फ किंवा छत्रीचा वापर करावा. सूर्याची किरणे थेट केसांवर पडणार नाहीत. उन्हाळ्यात टाळू स्वच्छ ठेवण्यासाठी सौम्य शॅम्पूचा वापर करून नियमितपणे केस धुवावेत.
केसांच्या आरोग्यासाठी पाणी पिणे किती महत्त्वाचे आहे. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्याचा परिणाम आधी केसांवर आणि नखांवर दिसतो. पुरेसे पाणी प्यायल्याने टाळू निरोगी राहते. केसांना बाहेरून निगा राखण्यासाठी तुम्ही नारळ तेल किंवा आर्गन ऑइल वापरू शकता.