Shruti Vilas Kadam
एका वाटीत 2 चमचे नारळ तेल आणि 1 चमचा तूप हलकं कोमट करून घ्या. हे मिश्रण केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावा आणि 30 ते 45 मिनिटांनी सौम्य शॅम्पूने केस धुवा. आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरल्यास चांगला फायदा मिळू शकतो.
तूप आणि नारळ तेलामध्ये नैसर्गिक फॅटी अॅसिड्स असतात, जे केसांच्या मुळांना पोषण देतात आणि केस निरोगी ठेवण्यास मदत करतात.
हे मिश्रण केसांमधील कोरडेपणा कमी करून केसांना नैसर्गिक मॉइश्चर देतं. त्यामुळे केस अधिक सिल्की आणि मऊ वाटतात.
नियमित वापरामुळे केस मजबूत होतात आणि स्प्लिट एंड्स किंवा हेअर फॉल कमी होण्यास मदत मिळते.
तूप आणि नारळ तेल स्काल्पमधील कोरडेपणा कमी करून खाज आणि कोंड्याचा त्रास कमी करण्यास मदत करतात.
या नैसर्गिक तेलामुळे केसांना हेल्दी शाइन मिळते आणि केस अधिक सुंदर दिसतात.
नारळ तेलातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आणि तुपाचे मॉइश्चरायझिंग गुणधर्म टाळूची (scalp) त्वचा कोरडी पडू देत नाहीत, ज्यामुळे कोंडा आणि खाज कमी होते.