Shruti Vilas Kadam
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी नारळ पाणी उत्तम पर्याय आहे. यात इलेक्ट्रोलाइट्स असल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
जास्त थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असल्यास उसाचा रस झटपट ऊर्जा देतो. नैसर्गिक साखरेमुळे शरीराला त्वरित ताकद मिळते.
पावसाळ्यात बाहेरील उसाचा रस स्वच्छतेअभावी त्रासदायक ठरू शकतो. या काळात ताजं आणि स्वच्छ नारळ पाणी अधिक सुरक्षित पर्याय मानलं जातं.
हिवाळ्यात दोन्ही पेय थंड प्रवृत्तीचे असल्याने मर्यादित प्रमाणात सेवन करणं फायदेशीर ठरतं. विशेषतः सर्दी-खोकल्याचा त्रास असल्यास काळजी घ्यावी.
नारळ पाण्यात कॅलरीज कमी असतात. त्यामुळे फिटनेस किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ते अधिक योग्य पर्याय आहे.
उसाचा रस पचन सुधारण्यास मदत करतो, तर नारळ पाणी अॅसिडिटी आणि पोटातील उष्णता कमी करण्यासाठी फायदेशीर मानलं जातं.
जर शरीराला हायड्रेशनची गरज असेल तर नारळ पाणी उत्तम, तर ऊर्जा कमी वाटत असल्यास उसाचा रस अधिक फायदेशीर ठरतो. ऋतू आणि आरोग्यानुसार योग्य पेय निवडणं महत्त्वाचं आहे.