Shruti Vilas Kadam
एका चमचा तांदूळ एक ग्लास पाण्यात २ते ३ तास भिजत ठेवा. कॉटनच्या मदतीने तांदळाचं पाणी चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी धुवा. किंवा चेहऱ्यावर हे पाणी स्प्रे करा.
रोज रात्री फेस टोनरप्रमाणे वापरा.आठवड्यातून 3 वेळा तांदळाचं पाणी फेसवर लावा.
तांदळाचं पाणी त्वचेला हायड्रेट ठेवून चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यास मदत करतं.
हे त्वचेतील अतिरिक्त तेल नियंत्रणात ठेवतं आणि पोर्स टाईट करण्यास मदत करतं.
उन्हामुळे त्वचेवर आलेला टॅन आणि जळजळ कमी करण्यासाठी तांदळाचं पाणी फायदेशीर ठरतं.
तांदळाचं पाणी त्वचेतील कोरडेपणा कमी करून स्किन सॉफ्ट ठेवण्यास मदत करतं.
नियमित वापरामुळे चेहऱ्यावरील हलके डाग आणि असमान त्वचा सुधारण्यास मदत होऊ शकते.
संवेदनशील त्वचेसाठी तांदळाचं पाणी आरामदायी ठरतं. त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत होते.