Shruti Vilas Kadam
एका वाटीमध्ये १ चमचा ॲपल साईडर व्हिनेगर घ्या. त्यामध्ये ४ चमचे साधे पाणी मिसळा. दोन्ही पदार्थ व्यवस्थित एकत्र करून मिश्रण तयार करा.
सर्वप्रथम सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. यामुळे टाळूवरील अतिरिक्त तेल आणि धूळ निघण्यास मदत होते. त्यानंतर केसांमधील पाणी काढून टाका.
तयार केलेले ॲपल साईडर व्हिनेगरचे मिश्रण टाळूवर हळूहळू लावा. केसांच्या मुळांपर्यंत मिश्रण पोहोचेल याची काळजी घ्या. डोळ्यांमध्ये मिश्रण जाणार नाही याची खबरदारी घ्या.
मिश्रण लावल्यानंतर बोटांच्या टोकांनी साधारण एक मिनिट हलक्या हाताने मसाज करा. यामुळे मिश्रण टाळूवर व्यवस्थित पसरेल. नखांनी टाळू खाजवणे टाळा.
मिश्रण लावल्यानंतर ४ ते ५ मिनिटांनी साध्या पाण्याने केस व्यवस्थित धुवा. व्हिनेगर टाळूवर जास्त वेळ ठेवू नका. जळजळ किंवा खाज जाणवल्यास त्वरित धुऊन टाका.
ॲपल साईडर व्हिनेगर आम्लयुक्त असल्यामुळे काही लोकांना टाळूवरील तेलकटपणा कमी झाल्यासारखे वाटू शकते.
ॲपल साईडर व्हिनेगरमध्ये आम्लीय गुणधर्म असतात. त्यामुळे टाळूवरील अतिरिक्त तेल आणि घाण स्वच्छ होण्यास मदत होऊ शकते. यामुळे कोंडा कमी होण्यास मदत होते.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.