Shraddha Thik
हिवाळ्याच्या काळात टाळूवर कोरडेपणा येतो, त्यामुळे कोंडा होण्याचा धोका वाढतो.
थंड वातावरणात केसांना कोंडापासून कसं वाचवायचं ते जाणून घेऊया.
हिवाळ्यात केस नियमितपणे धुणे खूप महत्वाचं आहे. तुमच्या केसांमध्ये साचलेली घाण, तेल आणि केमिकल्स याच्यापासून वाचण्यासाठी तुम्ही आठवड्यातून एकदा तरी केस धुवावेत, कारण स्वच्छ केसांमुळे कोंडा होण्याचा धोका कमी असतो.
कोंडा होत असेल तर टी ट्री ऑइल तुम्ही डोक्याला लावू शकता. टी ट्री ऑइलमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात. जे कोंड्याची समस्या दूर करतात.
कोंड्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी खोबरेल तेल आणि लिंबाचा रस मिसळून केसांना लावा. हे मिश्रण केसांना लावलाता केसांची मालिश करा.
दह्यामध्ये नारळ तेल मिक्स करुन केसांच्या मुळांना लावल्यानं कोंडा कमी होतो. तसेच दही आणि नारळाच्या तेलाचं हे मिश्रण केसांना लावले तर केस मजबूत आणि सिल्की होतात.
हिवाळ्यात केस कोरडे आणि डॅमेज होतात. केसांमध्ये कोंडा झाला तर केस गळतात. त्यामुळे हिवाळ्यात तुम्ही कडुलिंब आणि तुळशीच्या पानांचे पाणी केसांना लावू शकता.
हे पाणी तयार करण्यासाठी प्रथम एका भांड्यामध्ये पाणी घ्या. त्यानंतर त्या पाण्यामध्ये कडुलिंब आणि तुळशीची पाने टाका. त्यानंतर हे पाणी उकळून घ्या. उकळलेल्या पाण्यामध्ये थंड पाणी मिक्स करुन केस धुवा.