Shreya Maskar
कढीपत्तामधील अँटिऑक्सिडंट्सन, व्हिटॅमिन ए, बी आणि सी असतात. ज्यामुळे केस पांढरे होत नाही आणि केस गळतीही थांबते.
व्हिटॅमिन सी केसांना निरोगी, नैसर्गिक चमक ठेवण्यास महत्त्वाचा घटक आहे. जो स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर प्रमाणात असतो.
पांढऱ्या केसांची वाढ होऊ नये आणि मुळांना चांगले पोषण मिळावे, यासाठी शेंगदाणे खा.
आवळा खाल्ल्यामुळे केस गळण्याची आणि पांढऱ्या केसांची समस्या उद्भवत नाही.
बदाममध्ये व्हिटॅमिन ई असते. ज्यामुळे पांढऱ्या केसांची वाढ होत नाही.
डार्क चॉकलेट मध्ये तांबे असते. जे मेलेनिनच्या उत्पादनात मदत करते. मेलेनिन केसांचा रंग काळा ठेवण्यास मदत करते.
तीळामध्ये आयर्न, जिंक मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे केस काळेभोर राहण्यास मदत होते.
अक्रोडमधून बायोटिन मिळते. जे हेअर टिश्यूजना मजबूत ठेवून केसांना नैसर्गिकरित्या काळा रंग देते.