Sakshi Sunil Jadhav
सध्याच्या वाढत्या प्रदुषणामुळे केसांच्या अनेकसमस्यांना महिला आणि पुरुष दोघांनाही सामोरं जावं लागतं.
बऱ्याच महिलांची अशी तक्रार असते की, कोणताही ऋतू असला तरी त्यांचे केस हे खरखरीत, कोरडे असतात आणि खूप गळतातही.
पुढील माहितीत आपण याचसमस्येवर उपाय पाहणार आहोत. हे उपाय खूप सोपे आणि घरगुती पद्धतीचे आहेत.
सगळ्यात आधी ग्रीन टी १ कप पाण्यामध्ये मिक्स करुन हे पाणी उकळवून घ्या. मग ते थंड करुन घ्या.
आता थंड झालेल्या पाण्यात ३ चमचे नारळाचं दूध आणि १ चमचा लिंबाचा रस घाला. तुम्ही खोबरेल तेलही वापरु शकता.
आता केस आतून कोरडे करुन घ्या आणि तयार मिश्रण तुमच्या स्कॅल्पला बोटांच्या साहाय्याने लावा. मालिश करताना लावतो. त्याच पद्धतीचा वापर करा.
अर्ध्या तासाने तुम्ही रोजच्या शॅम्पूने केस धुवा. लक्षात ठेवा केस स्वच्छ धुवा. तसेच माईल्ड शॅम्पूचा वापर करा.
तुम्ही आठवड्यातून किमान १ दिवस ही स्टेप फॉलो करा. तुम्हाला याने महिन्याभरातच फरक जाणवेल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.