ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टाळू स्वच्छ करण्यापासून ते कोंडा कमी करण्यापर्यंत ताकाने केस धुण्याचे फायदे कोणते जाणून घ्या.
ताकातील लॅक्टिक अॅसिड टाळू स्वच्छ करते आणि बुरशीशी लढते, ज्यामुळे कोंडा कमी होण्यास मदत होते.
ताक हे केसांच्या क्यूटिकल्सना हायड्रेट करते. तसेच तकाने केस धुतल्यास मऊ आणि चमकदार होतात.
ताकातील प्रथिने केसांची मुळे मजबूत करतात आणि केस गळणे कमी करतात. आठवड्यातून दोनदा ताक वापरा.
टाळूमध्ये रक्तप्रवाह वाढल्याने केसांची वाढ होते, ज्यामुळे ते लांब आणि जाड होतात.
कढीपत्ता ताकात मिसळा आणि केस धुण्यासाठी वापरा. यामुळे राखाडी केस काळे होण्यास मदत होते आणि केस चमकदार होतात.
ताकाने केस धुतल्याने टाळूचे संसर्ग टाळण्यास मदत होते आणि तुमचे केस निरोगी राहतात.