Hair Care: शॉवरनंतर केसांची अशी घ्या काळजी; ओले केस गळणे आणि तुटणे होईल कमी

Shruti Vilas Kadam

ओले केस जोरात पुसू नका

टॉवेलने केस घासल्यामुळे केस तुटण्याची शक्यता वाढू शकते. केस हलक्या हाताने दाबून पाणी शोषून घ्या.

Hair Care | Saam Tv

ओल्या केसांवर लगेच कंगवा फिरवू नका

ओले केस अधिक नाजूक असतात. त्यामुळे केस शक्य तितके सुकल्यानंतरच हलक्या हाताने विंचरावेत.

Hair Care | Saam Tv

केस घट्ट बांधणे टाळा

ओले केस रबरबँडने घट्ट बांधल्याने केसांवर ताण येऊ शकतो आणि तुटण्याची शक्यता वाढू शकते.

Hair Care | Saam Tv

केस नैसर्गिकरित्या सुकू द्या

शक्य असल्यास केसांना काही वेळ नैसर्गिकरित्या सुकू द्या. सतत अतितापमानाच्या हेअर ड्रायरचा वापर टाळणे चांगले.

Hair Care | Saam Tv

झोपण्यापूर्वी केस पूर्णपणे कोरडे करा

ओले किंवा दमट केस घेऊन झोपल्याने केसांमध्ये घर्षण आणि गुंता वाढू शकतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी केस कोरडे असणे चांगले.

Hair Care | Saam Tv

केसांच्या मुळांना जास्त घासू नका

शॅम्पू करताना टाळूवर बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने मसाज करा. नखांनी जोरात घासणे टाळा.

Hair Care | Saam tv

केस सुकवताना योग्य पद्धत वापरा

केसांमधील अतिरिक्त पाणी आधी हलक्या हाताने काढा आणि त्यानंतर मऊ टॉवेल किंवा मायक्रोफायबर टॉवेलचा वापर करू शकता.

Hair care | Saam Tv

Sprouts Benefits: रोज सकाळी नाश्त्यात स्प्राउट्स खा, शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे!

Sprouts Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा