Shruti Vilas Kadam
ज्यांचे केस पातळ, सिल्की आणि स्ट्रेट आहेत, त्यांच्यासाठी बारीक दातांचा कंगवा योग्य ठरू शकतो. अशा कंगव्यामुळे केस व्यवस्थित विंचरता येतात. विशेषतः हेअरस्टाइल करताना स्लीक लुक मिळवण्यासाठी बारीक दातांचा कंगवा उपयोगी ठरतो.
कर्ली आणि दाट केसांसाठी नेहमी रुंद दातांचा कंगवा वापरण्याचा सल्ला दिला जातो. रुंद दातांमुळे कर्ल्समध्ये कंगवा सहज फिरतो आणि केसांमध्ये अडकण्याची शक्यता कमी होते. यामुळे केस तुटण्यापासून वाचण्यास मदत होऊ शकते.
कर्ली केसांमध्ये बारीक दातांचा कंगवा वापरल्यास केस त्यात अडकू शकतात. त्यामुळे केस ओढले जाणे आणि तुटण्याची शक्यता वाढते. कर्ल्सची नैसर्गिक रचना टिकवण्यासाठी रुंद दातांचा कंगवा अधिक योग्य पर्याय ठरतो.
दाट आणि वेव्ही केसांसाठी बारीक दातांचा कंगवा सहज फिरत नाही, तर खूप रुंद दातांच्या कंगव्याने केस पूर्णपणे सुलझतीलच असे नाही. अशा केसांसाठी पॅडल ब्रश चांगला पर्याय ठरू शकतो.
वेव्ही आणि दाट केसांसाठी पॅडल ब्रश निवडताना ब्रिसल्स कमी असलेला ब्रश वापरता येतो. यामुळे केस पटकन विंचरता येतात. विशेषतः लांब केस असणाऱ्यांसाठी हा पर्याय सोयीचा ठरू शकतो.
लांब आणि वेव्ही केसांना ब्लो-ड्राय करताना पॅडल ब्रश उपयोगी ठरू शकतो. केसांची लांबी आणि पोत लक्षात घेऊन योग्य ब्रश वापरल्यास हेअरस्टाइल करणे सोपे होऊ शकते.
केस सुंदर दिसावेत यासाठी फक्त हेअर केअर प्रोडक्ट्स पुरेसे नाहीत. केसांचा प्रकार लक्षात घेऊन योग्य कंगवा निवडणेही गरजेचे आहे. चुकीच्या कंगव्यामुळे केस गुंतणे आणि तुटणे वाढू शकते, त्यामुळे आपल्या केसांच्या गरजेनुसार कंगवा निवडा.