Shruti Vilas Kadam
थोड्या नारळाच्या तेलात काही कडीपत्ताची पानं टाका आणि मंद आचेवर काही मिनिटं उकळा. या प्रक्रियेमुळे तेलात कडीपत्ताच्या पानांचे पोषक घटक मिसळतात.
तेल पूर्ण थंड झाल्यावर ते गाळून स्वच्छ बाटलीत भरून ठेवा. हे तेल आठवडाभर सहज वापरता येते.
आठवड्यातून दोन वेळा हे तेल हलक्या हाताने स्काल्पवर मालिश करा. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केसांना योग्य पोषण मिळते.
कडीपत्ताच्या पानांतील प्रोटीन, बीटा-कॅरोटीन आणि अँटिऑक्सिडंट्समुळे केसगळती कमी होते. नियमित वापर केल्यास केस अधिक मजबूत आणि दाट होतात.
हे तेल केसांच्या मुळांपर्यंत जाऊन टाळूतील कोरडेपणा कमी करतं आणि डँडरफपासून नैसर्गिकरीत्या आराम मिळतो.
कडीपत्ताच्या पानांमध्ये असलेले अँटी-एजिंग गुणधर्म केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवतात आणि वेळेपूर्वी केस पांढरे होण्याची समस्या कमी करतात.
नियमित वापराने केस मऊ, गुळगुळीत आणि चमकदार होतात. नैसर्गिक पोषणामुळे केसांमध्ये निरोगी लुक येतो.