Shruti Vilas Kadam
कडीपत्त्यातील पोषक तत्त्वे केसांच्या मुळांना बळकट करतात. या मिश्रणाने नियमित मसाज केल्यास हेअर फॉल कमी होतो.
मेथी दाण्यांमध्ये प्रोटीन आणि निकोटिनिक अॅसिड असते, जे केसांच्या वाढीस मदत करते. आठवड्यातून 2-3 वेळा वापरा.
या तेलात अँटी-फंगल गुणधर्म असल्याने कोंडा कमी होतो. स्काल्पवर हलक्या हाताने मसाज करा.
खोबरेल तेलामुळे केसांना नैसर्गिक मॉइश्चर मिळते आणि केस सिल्की होतात.
कडीपत्ता केस अकाली पांढरे होण्यापासून संरक्षण करतो. नियमित वापर फायदेशीर ठरतो.
कडीपत्त्याची पाने आणि मेथी दाणे पाण्यात उकळा, नंतर त्यात खोबरेल तेल घालून मंद आचेवर शिजवा. थंड झाल्यावर गाळून बाटलीत साठवा.
हे तेल स्काल्पवर लावून 20-30 मिनिटे मसाज करा. किमान 1 तास ठेवा किंवा रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी शॅम्पू करा.