Shruti Vilas Kadam
बीटामध्ये नैसर्गिक रंग असतात. बीटाचा हेअर मास्क लावल्याने केसांवर हलकी लालसर किंवा बरगंडी छटा दिसू शकते. हे केसांवर दिसायला सुंदर आणि आकर्षक दिसतं.
हेअर मास्क तयार करण्यासाठी एक मध्यम आकाराचे ताजे बीट घ्या. ते स्वच्छ धुऊन त्याची साल काढा आणि लहान तुकडे करा.
बीटाचे तुकडे मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्या. आवश्यक असल्यास थोडे पाणी घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा.
तयार बीटाच्या पेस्टमध्ये दोन चमचे दही आणि एक चमचा मध घाला. दह्यामुळे केसांना मऊपणा मिळण्यास मदत होऊ शकते, तर मध केसांमधील ओलावा टिकवण्यास मदत करू शकतो.
या मिश्रणात एक चमचा खोबरेल तेल घाला. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र मिसळा. यामुळे चांगला घरगुती हेअर मास्क तयार होतो.
केस थोडे ओलसर करून त्यांच्यामध्ये हा मास्क लावा. साधारण २५ ते ३० मिनिटांनंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. बीटामुळे हातांना किंवा कपड्यांना रंग लागू शकतो, त्यामुळे हातमोजे वापरा.
हा मास्क वापरण्यापूर्वी त्वचेच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करा. खाज, जळजळ किंवा लालसरपणा जाणवल्यास वापर थांबवा.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.