Ginger Tulsi Tea Benefits: बदलत्या हवामानात आले-तुळशीचा चहा ठरेल आरामदायी; शरीराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Shruti Vilas Kadam

आले-तुळशीचा चहा कसा तयार करावा?

एका भांड्यात एक ते दीड कप पाणी घ्या. त्यात आल्याचे एक छोटे ठेचलेले तुकडे आणि ५ ते ७ तुळशीची पाने घाला. हे मिश्रण ५ ते ७ मिनिटे उकळू द्या. त्यानंतर चहा गाळून घ्या. चवीनुसार थोडा मध घालू शकता. मात्र, मध घालण्यापूर्वी चहा थोडा कोमट होऊ द्या.

Ginger - Tulsi | pinterest

सर्दीच्या त्रासात आराम मिळण्यास मदत

आले आणि तुळशीचा चहा प्यायल्याने घशाला आराम मिळू शकतो. सर्दीमुळे होणारी घशातील खवखव आणि अस्वस्थपणा कमी होण्यास मदत होते.

Ginger Tulsi Tea Benefits

घशातील खवखव कमी होण्यास मदत

आल्यामध्ये दाह कमी करण्यास मदत करणारे घटक असतात. कोमट आले-तुळशीचा चहा प्यायल्याने घशातील कोरडेपणा आणि खवखव कमी होण्यास मदत होऊ शकते.

Ginger Tulsi Tea Benefits

पचनासाठी फायदेशीर

आले पचनक्रियेला मदत करू शकते. जेवणानंतर पोट फुगणे किंवा गॅसचा त्रास होत असल्यास आल्याचा चहा काही लोकांना आराम देऊ शकतो.

Ginger Tulsi Tea Benefits

मळमळ कमी होण्यास मदत

आल्याचा वापर मळमळ कमी करण्यासाठी केला जातो. आले-तुळशीचा चहा प्यायल्याने काही लोकांना मळमळीचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.

Ginger Tulsi Tea Benefits | Pintrest

अँटिऑक्सिडंट्स वाढतात

तुळस आणि आल्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असलेले घटक आढळतात. हे घटक शरीरातील पेशींचे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात.

Ginger Tulsi Tea Benefits | pinterest

शरीराला उब मिळते

थंडीच्या दिवसांत गरमागरम आले-तुळशीचा चहा प्यायल्याने शरीराला उब मिळते. त्यामुळे थंड वातावरणात हा चाहा आरामदायी ठरू शकते.

Ginger Tulsi Tea Benefits | Saam Tv

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Ginger Tulsi Tea Benefits | GOOGLE

Jumping Jack Benefits: कमी वेळात शरीर ठेवा फिट! रोज ३० जंपिंग जॅक्स केल्याने शरीराला मिळतात हे 7 फायदे

Jumping Jack Benefits
येथे क्लिक करा