ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेक लोकांना केसांना तेल लावायला आवडत नाही.
अशा लोकांनी जास्वंदाची १० ते १५ फुलं लोखंडाच्या कढईत थोड्या पाण्यात भिजवावीत.
रात्री ते पाणी चांगलं उकळून घ्यावं आणि सकाळी उठल्यावर तो अर्क केसांना लावा.
एक तासानंतर केस धूवा यामुळे केसांना चमक येते.
मोड आलेली मेथी, कोरफड, जास्वंदाची फुलं एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या . हा पॅक केसांना लावल्यामुळे केसांना नैसर्गिक चमक येते.
जास्वंदाची फुलं, दोन आवळे, थोडी शिकेकाई आणि दोन रिठे पाण्यात टाकून ते मिश्रण व्यवस्थित उकळवून ठेवा.
केसांसाठी हेअरवॉश म्हणून वापरता येईल. हा हेअरवॉश रोज वापरला तरी चालेल.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.