Hair Care: केसात कोंडा झालाय? केस गळायला लागलेत? रात्री आठवड्यातून २ वेळा लावा हे तेल, महिनाभरात दिसेल फरक

Shruti Vilas Kadam

केसांचे होणारे त्रास

आजूबाजूला असलेल्या प्रदूषणामुळे केसांवर फार परिणाम होतो. केसात कोंडा, केस गळती, केस पांढरे होणे यासारखे अनेक त्रास होतात. त्यावर उपाय म्हणून हे घरी तयार केलेलं तेल नक्की वापरा.

Hair Care | Saam tv

जास्वंद, रोझमेरी,बदाम तेल वापरा

५ जास्वंद फुलं, १ टेबल स्पून रोझमेरी आणि बदाम तेल राज रात्री केसांना लावा. रात्रभर तेल तसेच ठेवा. त्यानंतर सकाळी केस सौम्य शॅम्पू लावून धुवून घ्या.

Hair Care | Saam tv

रोझमेरीमुळे मुळांपर्यंत रक्तप्रवाह नीट होतो

रोझमेरी केसांसाठी फायदेशीर असते. यामुळे केसांच्या मुळांपर्यंत रक्ताभिसरण उत्तम प्रकारे होतो आणि नवीन केस उगवण्यात मदत होते.

Hair Care | Saam Tv

जास्वंदात व्हिटामिन c चा समावेश

अमिनो ॲसिड्स आणि व्हिटामिन c जास्वंदात असल्यामुळे केसांना नैसर्गिकपणे केराटिन मिळते. त्यामुळे कोंडा आणि खाज कमी होते.

Hair Care | Saam Tv

बदाम तेलाने केस हायड्रेटेड राहतात

बदाम तेल हलकं असल्याने त्यामुळे डोकं जड होणे डोकं दुखी होत नाही.बदाम तेल केसांच्या मुळातील मॉइस्चर वाढवते त्यामुळे केस हायड्रेटेड राहतात.

Hair Care | Saam tv

तेल लावल्याने होणारे फायदे

जास्वंद, रोझमेरी आणि बदाम तेल एकत्र लावल्याने नवीन केस उगवण्यात मदत होते. केस जाड होऊन सतत तुटणे कमी होते.

Hair Care

कोंडा कमी होऊन खाज कमी करते

हे तेल केसातील सुका आणि ओला कोंडा कमी करुन केसांना येणारी खाज कमी करते. स्कॅल्प स्वच्छ करते. केसात होणारी जळजळ थांबवले.

Hair care | Saam Tv

Chandrakor Paithani Design: वटपौर्णिमेसाठी नव्या नवरीला भेट द्या चंद्रकोर पैठणी, पाहा या 7 सुंदर ट्रेंडी डिझाईन्स

Chandrakor Paithani Design | Pintrest
येथे क्लिक करा