Shruti Vilas Kadam
टोमॅटोचा रस टाळूवरील अतिरिक्त तेल आणि घाण कमी करण्यास मदत करू शकतो. त्यामुळे स्काल्प स्वच्छ राहून केसांच्या मुळांना पोषण मिळू शकतं.
टोमॅटोमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल गुण कोंडा कमी करण्यास मदत करू शकतात. नियमित वापरामुळे टाळूतील खाज आणि कोरडेपणा कमी होऊ शकतो.
टोमॅटोचा रस केसांवर लावल्यास केस मऊ आणि चमकदार दिसण्यास मदत होऊ शकते. यामुळे केस अधिक हेल्दी वाटतात.
टोमॅटोमधील व्हिटॅमिन A आणि C मुळे केसांच्या मुळांना काही प्रमाणात पोषण मिळू शकतं. त्यामुळे केस तुटणे कमी होण्यास मदत मिळते.
टोमॅटोचा रस केसांच्या आरोग्यास मदत करू शकतो, मात्र टक्कल पडलेल्या जागी नवीन केस उगवतात याबाबत कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.
हार्मोन्स, ताण, चुकीचा आहार किंवा अनुवंशिक कारणांमुळे केस गळत असतील तर फक्त घरगुती उपाय पुरेसे ठरत नाहीत. योग्य उपचारासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक असतो.
संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी टोमॅटोचा रस थेट लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करावी. जास्त वापरामुळे काहींना जळजळ किंवा खाज येऊ शकते.